ग्रेटर नोएडा- चीनमधील वुहान शहरामधून देशातील वाहन उद्योगांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. कोरोना विषाणुजन्य रोगामुळे वुहानमधील उद्योग ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत भारतीय वाहन उद्योगावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) सदस्य कंपन्यांकडून माहिती गोळा केली जात असल्याचे सांगितले. चीनमधून वाहनांच्या सुट्टे पार्ट निर्यात करण्याचे प्रमाण किती कमी होणार आहे, हे येत्या काही दिवसात समजू शकणार आहे. कोरोनाचा भारतीय वाहन उद्योगावर किती परिणाम होणार, हे सांगणे घाईचे होईल, असे एसआयएएमचे संचालक राजेश मेनन यांनी सांगितले. सर्वजण चीनमधील नव्या वर्षाच्या सुट्टीनंतर बाजार खुला होण्याची वाट पाहत आहेत.
हेही वाचा-कोरोनाचे थैमान : मृतांची संख्या ८०० वर, सार्सच्या बळींचा आकडा ओलांडला