महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारतीय विमान कंपन्यांनी इराणच्या प्रदेशातून जाणारा हवाई मार्ग टाळावा - डीजीसीए - NOTAM

अमेरिकेच्या विमान वाहतूक नियामक संस्था फेडरल एव्हिशन अॅडमिनेस्ट्रेशनने (एफएए) शुक्रवारी विमान वाहतूकविषयी विमान वाहतूक प्राधिकरांना नोटीस पाठविली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विमान कंपन्यांनी डीजीसीएशी चर्चा केली. त्यानंतर इराणमधील बाधित प्रदेशावरून विमान वाहतूक न करण्याचा सर्व विमान कंपन्यांनी निर्णय घेतला.

प्रतिकात्मक

By

Published : Jun 22, 2019, 7:43 PM IST

नवी दिल्ली- अमेरिका आणि इराणमध्ये तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विमान वाहतूक संचालनालय प्राधिकरणाने (डीजीसीए) भारतीय विमान कंपन्यांना इराणच्या जागेतून वाहतूक करू नये, अशी सूचना केली आहे.

अमेरिकेच्या विमान वाहतूक नियामक संस्था फेडरल एव्हिशन अॅडमिनेस्ट्रेशनने (एफएए) शुक्रवारी विमान वाहतूकविषयी विमान वाहतूक प्राधिकरांना नोटीस पाठविली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विमान कंपन्यांनी डीजीसीएशी चर्चा केली. त्यानंतर इराणमधील बाधित प्रदेशावरून विमान वाहतूक न करण्याचा सर्व विमान कंपन्यांनी निर्णय घेतला.

इराणने अमेरिकेच्या सैन्यदलाचे हवेतून जाणारे ड्रोन खाली पाडले होते. त्यानंतर इराणकडून व्यावसायिक विमान पाडले जावू शकते असा एफएएने इशारा दिला होता. इराण व अमेरिकेमध्ये तणावाची स्थिती असल्याने बहुतांश विमान कंपन्यांनी इरामधून जाणारा वाहतुकीचा मार्ग यापूर्वीच बदलला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details