नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातही देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांपुढे अडचणी आहेत. विमानांचे भाडे, देखभाल आणि विमान इंधनाकरता डॉलरमध्ये द्याव्या लागणाऱ्या पैशांचा प्रश्न भारतीय विमान कंपन्यांना भेडसावत आहे. विस्तारा विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की जानेवारीपासून रुपयाची डॉलरच्या तुलनेत 6 टक्के घसरण झाली आहे. ते विमान वाहतूक सल्लागार कंपनी सीएपीएच्या वेबिनारमध्ये बोलत होते.
विमान कंपन्यांना इंधनासाठी डॉलरमध्ये पैसे देताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विमान कंपन्यांकडून कमी वाहतूक होत असताना रुपयाची सतत घसरण होत आहे. हे बाजारातील जुळणारे गणित नसल्याचे विस्ताराचे मुख्य वाणिज्य अधिकारी विनोद कॅनन यांनी सांगितले.