महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'आर्थिकबरोबरच उर्जेमध्ये महाशक्ती होण्याचे ध्येय भारताला गाठावे लागेल' - Pandit Deendayal Upadhyay University convocation

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलताना म्हणाले, की महामारीच्या संकटानंतरच्या काळात भारताची प्रचंड आणि वेगाने प्रगती होईल.

मुकेश अंबानी न्यूज
मुकेश अंबानी न्यूज

By

Published : Nov 21, 2020, 7:07 PM IST

अहमदाबाद- भारताला चांगल्या अपारंपारिक, कमी कार्बनचे उत्सर्जन आणि कार्बनच्या पुनर्साखळीचे तंत्रज्ञानाची गरज आहे. उर्जा क्षेत्रात अभिकरणीय उर्जा आणि नवतंत्रज्ञानाची गरज आहे. त्यामधून आर्थिक आणि स्वच्छ व हरित उर्जेतून महाशक्ती होण्याची दोन्ही ध्येय पूर्ण होणे शक्य असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटले. ते पदवीदान समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलताना म्हणाले, की महामारीच्या संकटानंतरच्या काळात भारताची प्रचंड आणि वेगाने प्रगती होईल. येत्या दोन दशकामध्ये भारताची महासत्ता जगातील पहिल्या देशांमध्ये असेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-"चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करतंय आणि पंतप्रधान पाकिस्तानच्या झांज-चिपळ्या वाजवतायेत"

उर्जेची साठवणूक आणि वापरामध्ये मोठ्या प्रमाणात नवतंत्रज्ञानाची गरज

पुढे मुकेश अंबानी म्हणाले, की शतकाच्या मध्यावधीत जग हे आजच्या तुलनेत उर्जेचा दुप्पट वापर करणार आहे. येत्या दोन दशकांमध्ये भारताची दरडोई उर्जेची गरज आजपेक्षा दुप्पट होणार आहे. त्यामुळे भारताला आर्थिक महासत्ता होण्याबरोबर हरित आणि स्वच्छ व उर्जेत महाशक्ती होण्याची आवश्यकता आहे. उर्जेची साठवणूक आणि वापरामध्ये मोठ्या प्रमाणात नवतंत्रज्ञानाची गरज आहे. कोरोनाच्या स्थितीने अनिश्चितता निर्माण झाली असताना पदवीधर विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. सर्वोच्च आशा व आत्मविश्वासाने धाडस दाखवावे, असा अंबानी यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

हेही वाचा-'जबाबदारीची जाणीव असलेले लोकच जीवनात यशस्वी होतात'

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे होते.

'जबाबदारीची जाणीव असलेले लोकच जीवनात यशस्वी होतात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठात आज मोनोक्रिस्टलाइन सौर फोटो व्होल्टाइक पॅनेलच्या 45 मेगावॅट वीजनिर्मिती केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी झालेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ज्या लोकांना 'सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी'ची भावना असते, असेच लोक आयुष्यात यशस्वी असतात. तेच लोक आयुष्यात जबाबदारीपूर्वक काहीतरी करतात. जे अपयशी असतात, ते 'सेन्स ऑफ बर्डन'मध्ये राहणारे असतात. 'जबाबदारीची जाणीव' ही भावना एखाद्या व्यक्तीच्या जीवनात 'नवीन संधीच्या जाणीवेला' देखील जन्म देते.'

ABOUT THE AUTHOR

...view details