बार्सेलोना - येत्या १० वर्षात भारत '5G 'ची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ होणार असल्याचे भाकीत चीनची दूरसंचार कंपनी हुवाईने वर्तविले आहे. भारत ही वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. भारताची '5G'ची बाजारपेठ चीननंतर दुसऱ्या क्रमांकाची असणार असल्याचे हुवाई टेक्नॉलीजीचे अध्यक्ष जेम्स वु यांनी सांगितले. हुवाईने व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलबरोबर 5G ची चाचणी घेण्यासाठी करार केला आहे. भारत सरकारने देशात 5G ची टेस्ट लॅब सुरू करण्याचे निमंत्रण दिले आम्ही त्याचे स्वागत करू, असे त्यांनी सांगितले.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची होणार '5 G' ची बाजारपेठ - Vodafone Idea
भारत सरकारने देशात 5G ची टेस्ट लॅब सुरू करण्याचे निमंत्रण दिले, आम्ही त्याचे स्वागत करू
जागतिक दूरसंचार उद्योगाची संस्था असलेल्या जीएसएमने २०२५ पर्यंत 5G च्या 140 कोटी कनेक्शन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हे प्रमाण जागतिक बाजारपेठेच्या १५ टक्के आहे. यामध्ये एकूण '५ G'पैकी निम्मे कनेक्शन हे अमेरिकेतील, ३० टक्के चीनमधील तर ५ टक्के कनेक्शन हे भारतामधील असणार आहेत.