नवी दिल्ली - अमेरिका भारताचा व्यापार प्राधान्यक्रमाचा दर्जा (जीएसपी) काढून घेणार आहे. भारताने अमेरिकेच्या विनंतीनुसार परस्परांना मान्य होतील, असे उपाय सुचविले होते. मात्र दुर्दैवाने ते अमेरिकेने स्विकारले नाहीत, अशी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिका ५ जून २०१९ पासून जीएसपीचा दर्जा काढून घेणार आहे. त्याबाबतची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. यावर भारताने संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. वाणिज्य मंत्रालयाने म्हटले, अमेरिकेसह इतर देशांप्रमाणे भारत सरकार राष्ट्रहिताचे संरक्षण करते. आम्हाला आमच्या लोकांची चिंता आहे. जीवनमान उंचावण्याची लोकांना महत्त्वाकांक्षा आहे. हा आमच्यासाठी मागदर्शनाचा भाग असल्याची सरकारची धारणा आहे.