महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बागलकोट हवाई हल्ल्यात वापरलेले 'हे' बॉम्ब सरकार पुन्हा करणार खरेदी - Bomb used in Bagalkot Airstrike

भारताचे चीनबरोबर  संबंध ताणलेले असताना आपतकालीन वित्तीय अधिकारांतर्गत हवाई दलाला बॉम्ब खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

 स्पाईस 2000 बॉम्ब
स्पाईस 2000 बॉम्ब

By

Published : Jun 30, 2020, 8:53 PM IST

नवी दिल्ली – जमिनीवरील लक्ष्याला उद्धवस्त करण्याच्या संरक्षण दलाच्या मारकतेला आणखी बळ मिळणार आहे. स्पाईस 2000 बॉम्ब हे अधिक अद्ययावत आणि प्राणघातक स्वरुपात खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

भारताने गतवर्षी स्पाईस 2000 बॉम्बचा वापर खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील बागलकोटमध्ये दहशतवाद्यांच्या छावण्या नेस्तानाबूत करण्यासाठी केला होता. भारताचे चीनबरोबर संबंध ताणलेले असताना आपतकालीन वित्तीय अधिकारांतर्गत हवाई दलाला बॉम्ब खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

ही आहेत स्पाईस बॉम्बची वैशिष्टये-

  • स्पाईस 2000 बॉम्ब हे 70 किमीपर्यंतच्या लक्ष्याला उद्धवस्त करू शकतात.
  • नव्या श्रेणीतील हे बॉम्ब शत्रुचे बंकरही उद्धवस्त करू शकतात.
  • त्याचा वापर हवाई दलाने बागकोटमधील हवाई हल्ल्यात केला होता. त्यामुळे मजबूत छावण्या आणि इमारतीचे मोठे नुकसान झाले होते.

आपत्कालीन अधिकाराचा वापर करून नरेंद्र मोदी सरकारने संरक्षण दलाला 500 कोटीपर्यंतच्या शस्त्रास्त्रे खरेदीला परवानगी दिली आहे. नौसेना आणि सैन्यदलही संरक्षण उत्पादने विदेशातून खऱेदी करणार आहे.

गलवानच्या खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत २० जवानांना वीरमरण आले. त्यानंतरही चीनकडून नियमभंग होत असल्याने भारतानेही गंभीरपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details