नवी दिल्ली - सरकारने अमेरिकेत उत्पादन होणाऱ्या आणि तेथून आयात केल्या जाणाऱ्या बादाम, अक्रोड आणि डाळींसह २८ वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. सरकारने अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरादाखल ही व्यापारी कारवाई केली आहे. आजपासून हे वाढीव दर लागू होणार आहेत. याचा अमेरिकन व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे.
भारताचे प्रत्युत्तर, अमेरिकेतून आयात होणाऱ्या २८ उत्पादनांवर वाढवला कर - america
अमेरिकेने मागील वर्षी भारताकडून काही स्टीलच्या वस्तूंवर २५ टक्के आणि अॅल्युमिनियमच्या काही उत्पादनांवर १० टक्के शुल्क लावले होते. मात्र, त्याआधीया वस्तूंवर तेथे कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. या कारवाईच्या प्रत्युत्तरादाखल भारताने अमेरिकेकडून आयात होणाऱ्या २८ वस्तूंवरील शुल्क वाढवले आहे.
ट्रम्प, पंतप्रधान मोदी
CBIC ने जारी केली अधिसूचना
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) ३० जून २०१७च्या आपल्या एका जुन्या अधिसूचनेवर पुनर्विचार करून शनिवारी ही अधिसूचना जारी केली. अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांवर लागू असलेले आयात शुल्क पूर्ववत राहील. या कारवाईमुळे भारताला २१.७ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.