नवी दिल्ली - गोपनीयतेचे धोरण बदलल्यामुळे टीकेची धनी झालेल्या व्हॉट्सअपवर भारत सरकारनेही दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपने गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे, अशी सूचना भारत सरकारने व्हॉट्सअप कंपनीला केली आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान कंपनीने व्हॉट्सअपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र लिहून गोपनीयतचे धोरण मागे घेण्याची सूचना केली आहे. या पत्रात मंत्रालयाने म्हटले की, भारतात व्हॉट्सअपचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. तसेच कंपनीला सेवेसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
व्हॉट्सअपच्या प्रस्तावित गोपनीयतेचे धोरण आणि अटी वापरकर्त्याला मान्य नसेल तर सेवा बंद करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे मोठी चिंता वाढल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.
संबंधित बातमी वाचा-व्हॉट्सअपने अटींसह बदलल्या गोपनीयतेच्या अटी
काय म्हटले आहे भारत सरकारने?
- माहितीची गोपनीयता, निवडीचे स्वातंत्र्य आणि डाटा सुरक्षा याबाबत कंपनीने पुनर्विचार करावा, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
- भारतीयांचा पूर्णपणे आदर करावा.
- कोणतेही एकांगी बदल आणि अटी योग्य नाही. तसेच ते अस्वीकारार्ह आहेत.
- देशात व्हॉट्सअपचे ४०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. कंपनीने धोरणात बदल केल्याने देशातील नागरिकांवर चुकीचा परिणाम होणार आहे.
- डाटा, माहिती सुरक्षा, गोपनीयता, इनक्रिप्शन तसेच दुसऱ्या अॅपमध्ये डाटा शेअर करण्याबाबत सविस्तर माहितीही सरकारने व्हॉट्सअपकडून मागविली आहे.
संबंधित बातमी वाचा-व्हॉट्सअॅप बॅकफूटवर, प्रायव्हसी अपडेटचा निर्णय पुढं ढकलला