महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इंडेन गॅस कंपनीच्या पोर्टलमधून ५८ लाख ग्राहकांच्या डाटाला गळती, सुरक्षा संशोधक एलियट अॅल्डरसनचा दावा

इंडेनच्या पोर्टलमध्ये सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने घडला प्रकार

1

By

Published : Feb 19, 2019, 1:43 PM IST


नवी दिल्ली- आधारचा डाटा सुरक्षित नसल्याचे दावा करणाऱ्या फ्रान्सच्या सुरक्षा संसोधकाने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. इंडेन गॅस कंपनीकडील ५८ लाख भारतीयांचे आधार क्रमांक, डिलर आणि वितरकांची माहिती लिक झाल्याचा दावा सुरक्षा संशोधकाने केला आहे.

बाप्टिस्ट रॉबर्ट हा सुरक्षा संशोधक ट्विटरवर एलियट अॅल्डरसन या नावाने कार्यरत आहे. त्याने यापूर्वी आधारचा डाटा लिक झाल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हेतर आधारच्या (युएआयडीए) संचालकांच्या बँक खात्यावर १ रुपया भरून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता.

इंडेनचा डाटा हा फक्त युझरनेम व पासवर्ड असलेल्यांना फक्त दिसू शकतो. तरीही सुमारे ५८ लाख २६ हजार जणांची गोपनीय माहिती उघड झाल्याचे एल्डरसनने म्हटले आहे. इंडेनच्या पोर्टलमध्ये सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने वितरक, त्यांचे पत्ते आणि आधार क्रमांक ही आकडेवारी गोपनीय राहू शकत नसल्याचे एल्डरसनने ट्विट केले आहे.

इंडेन कंपनीकडून आयपी ब्लॉक करण्याआधी सुमारे ११ हजार वितरकांकडील ग्राहकांचा डाटा त्याला हाताळता येत होता. इंडनने माझा आयपी ब्लॉक केला, अन्यथा १ हजार ५७२ वितरकांकडील डाटा पाहू शकलो, असे त्याने म्हटले आहे. सुमारे ६७ लाख ९१ हजार २०० ग्राहकांचा डाटा लिक झाला असावा, असे एल्डलरसने दावा केला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागाने ग्राहकांचा डाटा सुरक्षित व गोपनीय राहण्यासाठी कंपन्यांसाठी कठोर नियम लागू केले आहेत. प्रत्यक्षात सरकारी विभागांकडेच सामान्यांची माहिती गोपनीय राहू शकत नसल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details