हैदराबाद- नव्या वर्षात प्राप्तिकर परतावा भरण्याच्या तारखा लक्षात ठेवणे सोपे होण्यासाठी प्राप्तिकर विभागाने कालदर्शिका (कॅलेंडर) प्रसिद्ध केले आहे. यामध्ये प्राप्तिकर आणि विवरणपत्र भरण्यासाठी महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत.
प्राप्तिकरदात्यांनी वेळेत प्राप्तिकर विभागाला माहिती दिली तर होणारा दंड टळू शकतो. तसेच ऐनवेळी होणारी धावपळ वाचू शकते.
हेही वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण : टीसीएसचे एनसीएलएटी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल
या आहेत महत्त्वाच्या तारखा-
- ३१ मार्च - वर्ष २०१९-२० साठी प्राप्तिकराचे सुधारित व उशीरा झालेले विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख आहे.
- १५ मार्च - आकलन वर्ष २०१९-२० च्या चौथ्या आणि शेवटट्या तिमाहीत आगाऊ (अॅडव्हान्स) प्राप्तिकर भरण्याची शेवटची तारीख आहे.
- ३१ मे - मागील तिमाहीमधील जमा झालेल्या टीडीएसचे तिमाही स्टेटमेंट जमा करण्याची तारीख
- १५ जून - आकलन वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीमधील पहिला आगाऊ प्राप्तिकर भरण्याची शेवटची तारीख
- २४ जूलै - प्राप्तिकर दिन
- ३१ जूलै - वैयक्तिक प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत
- १५ सप्टेंबर - आगाऊ कर जमा करण्याची मुदत
- ३० सप्टेंबर - कॉर्पोरेट प्राप्तिकरदात्यांना विवरणपत्र (आयटीआर) जमा करण्याची तारीख
- ३० नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे आयटीआर लेखापरीक्षण आणि विवरणपत्र आकलन वर्ष २०२०-२१ साठी जमा करणे.
- १५ डिसेंबर - आकलन वर्ष २०२१-२२ साठी आगाऊ कराचा तिसरा हप्ता भरण्याची तारीख