महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मलेशियाकडून पामतेल आयात थांबवा; सरकारची उद्योगांना सूचना - new citizenship law

सूत्राच्या माहितीनुसार, मलेशियामधून ३० टक्के पामतेलाची भारतात आयात करण्यात येते. तर ७० टक्के इंडोनिशियामधून पामतेलाची आयात करण्यात येते.

palm oil
पामतेल

By

Published : Jan 8, 2020, 7:21 PM IST

नवी दिल्ली - काश्मीर प्रश्नाबाबत आणि नव्या नागरिकत्व कायद्याबद्ल टिपण्णी करणे, मलेशिया सरकारला चांगलेच महागात पडणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने देशातील उद्योगांना मलेशियामधून पामतेल आयात न करण्याच्या अनौपचारिक सूचना केल्या आहेत.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने खाद्यतेल उद्योगांशी संबंधित भागीदारांची बैठक घेतली. या बैठकीत मलेशियन पामतेल खरेदी थांबविण्याच्या उद्योगांना अनौपचारिक सूचना करण्यात आल्या आहेत. भारत हा खाद्यतेलाची आयात करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे.

हेही वाचा-सोने प्रति तोळा ४८५ रुपयाने महाग; कमकुवत रुपयाचा परिणाम

सूत्राच्या माहितीनुसार, मलेशियामधून ३० टक्के पामतेलाची भारताच आयात करण्यात येते. तर ७० टक्के इंडोनिशियामधून पामतेलाची आयात करण्यात येते. देशातील तेलशुद्धीकरण प्रकल्प हे मलेशियाऐवजी इंडोनिशियामधून पामतेल आयात करू शकतात. त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च लागणार नाही. पामतेलाव्यतिरिक्त सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची भारत आयात वाढवू शकतो, असेही सूत्राने सांगितले.

हेही वाचा-इराणने अमेरिकन सैन्यतळावर हल्ला केल्यानंतर शेअर बाजारात अस्थिरता

ABOUT THE AUTHOR

...view details