महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारत-अमेरिकेमधील व्यापारी समस्या सुटल्या; पहिल्या व्यापारी पॅकेजचा मार्ग मोकळा

अमेरिकेचे उच्चस्तरीय  प्रतिनिधी पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते व्यापारी कराराच्या टप्प्याला अंतिम स्वरुप देणार आहेत.

संग्रहित - डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Nov 15, 2019, 6:47 PM IST

वॉशिंग्टन - भारत आणि अमेरिकेमध्ये असलेले महत्त्वपूर्ण व्यापारी वाद सोडविले आहेत. यामुळे पहिल्या व्यापारी पॅकेजचा मार्ग मोकळा झाला आहे. पॅकेजमधून दोन्ही देशांना बाजारपेठेत समान पातळीवर प्रवेश अपेक्षित आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि अमेरिकेचे वाणिज्य प्रतिनिधी रॉबर्ट लिथीझर यांच्यामध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी बैठक झाली. बैठकीदरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांमध्ये गुरुवारी फोनवरून संवाद झाला. अमेरिकेचे उच्चस्तरीय प्रतिनिधी पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते व्यापारी कराराच्या टप्प्याला अंतिम स्वरुप देणार आहेत.

हेही वाचा-इंटरकनेक्ट युझेज चार्जेस रद्द करण्याची जिओकडून पुन्हा मागणी; भारती एअरटेलचा विरोध

अमेरिकेने व्यापारी प्राधान्यक्रमाचा दर्जा काढून घेतल्यानंतर भारत व अमेरिकेमध्ये व्यापारी संबंध तणावपूर्ण झाले. त्यावेळी भारताने अमेरिकेच्या २५ वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details