वॉशिंग्टन - अमेरिकेबरोबर व्यापारी युद्ध सुरू असताना चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. अशा स्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादित मालावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका बसून चीनचा आर्थिक विकासदर आणखी कमी होवू शकतो, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इशारा दिला आहे.
चालू वर्षात चीनचा विकासदर हा ६.२ टक्के राहिल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे. मात्र हा अंदाज वर्तविताना अतिरिक्त आयात शुल्काचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विचार केला नाही. अमेरिकेने चीनच्या उत्पादित मालावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागू केले तर चीनच्या विकासदर कमी होईल, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे. चीनने विपरित असलेल्या बाजार अवस्थेला तोंड देण्यासाठी विदेशी विनिमयाचा वापर करायला हवा, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे.