वॉशिंग्टन - कोरोना महामारीने जागतिक अर्थव्यवस्थेची घसरण झाली आहे. त्यामुळे विकसनशील देशांना मोठ्या निधीची गरज लागणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमख ख्रिस्टिलिना जॉर्जिव्हिया यांनी सांगितले. आपण मंदीत प्रवेश केला आहे, हे स्पष्ट आहे. ही मंदी २००९च्या जागतिक मंदीहून वाईट असेल, असा त्यांनी इशारा दिला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठांना सुमारे २.५ लाख कोटी डॉलरची आवश्यकता आहे. अनेक देशांमधील स्त्रोत अपुरे आहेत, असे त्यांनी सांगितले. अनेक देशांवर कर्जाचा बोझा आहे, याकडेही ख्रिस्टिलिना जॉर्जिव्हिया यांनी लक्ष वेधले आहे.