नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात एन-९५ मास्कचा तुटवडा जाणवत आहे. या संकटात दिलासा देणारी कामगिरी आयआयटी दिल्लीच्या स्टार्टअपने केली आहे. या स्टार्टअपने एन-९५ प्रमाणे सुरक्षित असलेला 'कवच' हा मास्क केवळ ४५ रुपयात उपलब्ध केला आहे.
आयआयटी दिल्लीच्या माहितीप्रमाणे 'कवच' हा मास्क एन-९५ एवढाच प्रभावी आहे. देशात एन-९५ ची किंमत जास्त आहे. त्यामुळे अधिकतर लोकांना एन-९५ ची किंमत परवडत नाही. कवच हा मास्क ईटीईएक्स स्टार्टअपने तयार केला आहे. यामध्ये एन-९५ प्रमाणे फिटिंग आणि इंजिनिअरिंग फिल्टरेशन आहे. त्यामुळे ३ मायक्रॉन आकाराचे सूक्ष्म घटक मास्कमधून फिल्टर होवू शकतात. जास्तीत जास्त लोकांना कोरोनापासून संरक्षण करता यावे, यासाठी मास्कची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा-बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांची पीएम केअर्सला ५ कोटींचे योगदान