महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 'हे' राज्य घेणार आयआयएमची मदत - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट

आयआयएम सरकारमधील विविध विभागात असलेले रचनात्मक प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. त्याचा भ्रष्टाचाराशी संबंध लक्षात घेवून त्यावर मात करण्यासाठी उपाय सुचविणार असल्याचे सरकारमधील सूत्राने माध्यमांना सांगितले.

संपादित - भ्रष्टाचारावर आळा घालण्यावर आयआयएमची मदत

By

Published : Nov 18, 2019, 1:34 PM IST

अमरावती (आंध्रप्रदेश)- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातील राज्य सरकार विविध प्रयत्न करतात. आंध्रप्रदेश राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.


आयआयएम सरकारमधील विविध विभागात असलेले रचनात्मक प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. त्याचा भ्रष्टाचाराशी संबंध लक्षात घेवून त्यावर मात करण्यासाठी उपाय सुचविणार असल्याचे सरकारमधील सूत्राने माध्यमांना सांगितले.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक १०० अंशाने वधारला; जागतिक मंचावरील सकारात्मकतेचा परिणाम

भ्रष्टाचारामुळे आंध्रप्रदेशमधील काही विभागे भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखली जातात. यामध्ये महसूल, पोलीस, महानगरपालिका आणि नोंदणी या विभागांचा समावेश आहे. मंडल कार्यालये, नोंदणी कार्यालये, शहर नियोजन विभाग आणि पोलीस विभागामधील रचनात्मक समस्या शोधून काढण्यासाठी आयआआयएम-ए संस्था राज्य सरकारला सहकार्य करणार आहे. आयआयएमने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सुधारणात्मक कृती करणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-देशाचा जीडीपी दुसऱ्या तिमाहीत घसरून ४.९ टक्के होईल - एनसीएईआरचा अंदाज

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी भ्रष्टाचाराविरोधात उच्चस्तरीय बैठक घेतली होती. येत्या काही आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) मनुष्यबळ हे संपूर्ण राज्यभरात कार्यरत होणार असल्याचे त्यांनी घोषणादेखील केली आहे. प्रशासनामध्येही अनेक अडचणी आहेत. त्या प्रथम सोडविल्या पाहिजेत, असेही सरकारी सूत्राने सांगितले. अनेक प्रकरणात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरील कारवाई रद्द होते. कारण त्यासाठी संबंधित उच्च यंत्रणेकडून मंजुरी दिली जात नाही, असे एसीबीमध्ये सेवेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने (आयपीएस) सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details