महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इफ्को आर्थिक उलाढालीत सहकारी संस्थांमध्ये जगात अव्वल - इफ्को न्यूज

इफ्को हे जीडीपी आणि देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. इफ्कोमध्ये ३६,००० हजारांहून अधिक सहकारी सदस्य आहेत. या कंपनीची उलाढाल सुमारे ६ अब्ज डॉलर आहे.

इफ्को
इफ्को

By

Published : Jan 21, 2021, 5:01 PM IST

नवी दिल्ली- इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लि. (इफ्को) या कंपनीने उलाढालीत १२५ व्या स्थानावरून ६५ व्या जागी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी इफ्को ही सहकारी क्षेत्रात जगातील पहिल्या ३०० कंपन्यांमध्ये आघाडीवर आली आहे. हे गुणांकन जीडीपीच्या तुलनेत दरडोई होणाऱ्या उलाढालीवरून काढण्यात आले आहे.

इफ्को हे जीडीपी आणि देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. इफ्कोमध्ये ३६,००० हजारांहून अधिक सहकारी सदस्य आहेत. या कंपनीची उलाढाल सुमारे ६ अब्ज डॉलर आहे. ही उलाढाल जगातील सहकारी संस्थांमध्ये सर्वाधिक आहे. इफ्कोचे व्यस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी म्हणाले, हा इफ्को आणि सहकारी क्षेत्रासाठी अभिमानास्पद क्षण आहे.

हेही वाचा-जाणून घ्या, शेअर बाजार ५०,०००हून अधिक ओलांडण्याची कारणे

भारतीय सहकारी चळवळीला मोठे यश मिळाले आहे. इफ्को ही नेहमीच देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बांधील आहे. तसेच भारतीय सहकारी चळवळीला बळकट करण्यासाठी बांधील आहे. नवसंशोधन हा यशासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मी इफ्को आणि सहकारी क्षेत्रातील सर्वांचे अभिनंदन करतो. जागतिक सहकारी आघाडी (आयसीए) आणि कोऑपरेटिव्ह आणि सोशल एन्टरप्रायजेसमधील युरोपियन रिसर्च इन्स्टिट्यूटने जागतिक सहकार निर्देशांक लाँच केला आहे.

हेही वाचा-ऐतिहासिक! सेन्सेक्सने प्रथमच ओलांडली 50,000 ची पातळी

काय आहे इफ्को?

इफ्फको ही खत उत्पादक व वितरक म्हणून कार्यरत असलेली सहकारी संस्था आहे. ही सहकारी संस्था देशातील ५ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सेवा देते. देशातील ३५ हजारांहून अधिक सहकारी संस्था इफ्फकोशी संलग्न आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details