नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात राज्यांचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदने (आयसीएमआर) कोरोनाच्या चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपयांची मर्यादा काढून टाकली आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचणीचा खर्च कमी होणार आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी किती किमान किंमत ठेवायची, हा अधिकार आयसीएमआरने राज्यांना दिला आहे.
देशात काही कंपन्यांकडून कोरोना चाचणीचे किट्स तयार करण्यात आले आहेत. कोरोना चाचणी किट्सची बाजारपेठ खुली असून त्यामध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे कमी किमतीत कोरोनाच्या चाचणी होवू शकतात, असे आयसीएमआरने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नव्हे 'जाळे'; टाळेबंदीतही ग्राहकांची होतेय फसवणूक