महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आयसीआयसीआय बँक रविवारपासून आकारणार जादा शुल्क, जाणून घ्या सविस्तर - icici cheque book charges

आयसीआयसीआय बँकेने सुधारित सेवा शुल्काची वेबसाईटवर माहिती दिली आहे. बँकेच्या सेवा शुल्कात 1 ऑगस्ट 2021 पासून बदल होणार आहे.

आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँक

By

Published : Jul 30, 2021, 9:35 PM IST

मुंबई- तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. भारताची आघाडीची खासगी बँक आयसीआयसीआयने आर्थिक व्यवहारावरील सेवाशुल्कात बदल केला आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे, चेक वटविणे यासाठी जादा शुल्क द्यावे लागणार आहे.

आयसीआयसीआय बँकेने सुधारित सेवा शुल्काची वेबसाईटवर माहिती दिली आहे. बँकेच्या सेवा शुल्कात 1 ऑगस्ट 2021 पासून बदल होणार आहे.

आर्थिक व्यवहारावर लागणाऱ्या शुल्कात असा होणार बदल

ग्राहकांना एका महिन्यात 2 लाखापर्यंत पैस काढणे व जमा करण्याकरिता आर्थिक व्यवहार मोफतपणे करता येणे शक्य होते. बँकेच्या नव्या शुल्कानुसार ग्राहकांना एका खात्यावर जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत पैसे काढणे व जमा करण्याची सेवा मोफत घेता येणार आहे.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 ऑगस्टपर्यंत राहणार बंद

1 लाखांहून अधिक आर्थिक असेल तर बँकेकडून प्रति हजार रुपयापर्यंत 5 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर अशा व्यवहारासाठी कमीत कमी 150 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या बँकेकडून 2 लाखांहून अधिक आर्थिक व्यवहार असेल तर असे शुल्क आकारण्यात येते. हे आर्थिक व्यवहाराचे नियम सर्व बचत खाती, पगारी खाती, सिल्व्हर सेव्हिंग्ज, सॅलरी अकाउंट आणि गोल्ड अकाउंटवरही लागू असणार आहे.

हेही वाचा-चालू वर्षात एप्रिल ते जून तिमाहीत सोन्याच्या आयातीत 76 टनची वाढ

बिगर आयसीआयसीआय बँक एटीएमच्या व्यवहारावरही शुल्कात होणार बदल

बिगर आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार असाल तर त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. हे अतिरिक्त शुल्क सिल्व्हर, गोल्ड, मॅग्नियम, टायटॅनियम आणि वेल्थ कार्ड असेल तर त्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नव्हते. मात्र, नव्या नियमाप्रमाणे हे कार्ड असेल तर पहिले केवळ तीन आर्थिक व्यवहार सहा महानगरांमध्ये मोफत असणार आहे. तर बिगर महानगरांकरिता केवळ पहिले पाच आर्थिक व्यवहार मोफत असणार आहेत. तर सर्व ग्राहकांना महानगरांमध्ये केवळ तीन मोफत आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. तर इतर तीन व्यवहारानंतर ग्राहकांना प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये तर बिगर आर्थिक व्यवहारासाठी 8.50 रुपये आकारण्यात येणार आहेत.

चेकबुकसाठीही बदल-

ग्राहकांना 20 पानांचे चेकबुक मोफत मिळते. तर त्यानंतर ग्राहकाला 10 पानांच्या चेकबुकसाठी 20 रुपये द्यावे लागते. सुधारित नियमानुसार ग्राहकाला 25 पानी मोफत चेकबुक मिळणार आहे. तर 10 पानांच्या चेकबुकसाठी 20 रुपये द्यावे लागणार आहे. बँकेच्या सर्व सेवा घेताना अतिरिक्त जीएसटी द्यावा लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर व काही निवडक खातेदारांना नियमाप्रमाणे जीएसटी द्यावा लागणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details