नवी दिल्ली- पर्यटन क्षेत्रासाठी सरकारने तत्काळ मदत करावी, अशी इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ) या संघटनेने केली आहे. कोरोना महामारीचा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सरकारने विविध पातळीवर मदत करावी, असे आयएटीओने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाएवढी एकवेळ आर्थिक मदत करावी, अशी आयएटीओने मागणी केली आहे. अनेक टूर ऑपरेटर्सनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तर काही जणांना ३० टक्के वेतन मिळत आहे.
केंद्र सरकारकडून सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज दिले जात आहेत. त्यामध्ये बदल करत पर्यटन उद्योगालाही कर्ज मिळावे, अशी संघटनेने मागणी केले आहे.