नवी दिल्ली - देशातील तीन मोबाईल ऑपरेटर कंपन्यांनी फोन कॉलिंगसह डाटा सेवेचे किमान दर निश्चित करण्याची मागणी केली आहे. या मागणीला इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन (आयएएमएआय) विरोध केला आहे.
नुकतेच तीन दूरसंचार कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढविले आहेत. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांची बाजारपेठ संकटात नसल्याचे दिसून आल्याचे आयएएमएआयने म्हटले आहे. ही संघटना गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप अशा कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करते.
किमान दर निश्चित करण्यासाठी सेवेच्या तरतुदी होणाचा खर्च लक्षात घेतला पाहिजे, असे आयएएमएआयने म्हटले आहे. सध्या, दूरसंचार कंपन्या त्यांच्या मर्जीप्रमाणे मोफत कॉलिंग अथवा डाटा सेवा ग्राहकांना देवू शकतात. ग्राहकांना ४ जीची सेवा घेताना प्रति जीबी डाटासाठी ३.५ रुपये खर्च येतो. जर दूरसंचार कंपन्यांच्या मागणीप्रमाणे डाटाचे किमान दर निश्चित केले तर हे दर ५ ते १० पटीने वाढणार आहेत.