नवी दिल्ली - इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची ग्राहकांना वरचेवर चांगली संधी मिळत आहे. हुंदाई मोटरने इलेक्ट्रिक कार कॉनाची किंमत सुमारे १.५८ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने जीएसटी दर कमी केल्याचा फायदा थेट ग्राहकांना मिळवून देण्यासाठी हुंदाईने हा निर्णय घेतला आहे.
हुदांईच्या कॉना मॉडेलची किंमत १.५८ लाख रुपयाने स्वस्त होणार आहे. त्यामुळे ग्राहकाला २५.३ लाख रुपयांऐवजी २३.७१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. बदलण्यात आलेले दर हे १ ऑगस्ट, २०१९ पासून लागू होणार असल्याचे हुंदाई कंपनीने म्हटले आहे. कंपनीने देशातील ११ शहरात १५ वितरक नेमले आहेत. यामधून ग्राहकांनी १५२ कॉनासाठी नोंदणी केली आहे.
टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार टिगोरची किंमत ८० हजार रुपयांनी कमी केल्याचे गुरुवारी जाहीर केले होते.