सॅन फ्रान्सिस्को - चीनी तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पादनांच्या आयातीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी घातली आहे. त्यानंतर गुगलने हुवाईला अँड्राईड सेवा देण्याचा निर्णय बंद घेतला. या धक्क्यानंतर हुवाईला आणखी एक धक्का मायक्रॉसॉफ्टने दिला आहे. मायक्रॉसॉफ्टने ऑनलाईन स्टोअरवरून हुवाईचे लॅपटॉप काढून टाकले आहेत.
गुगलनंतर मायक्रोसॉफ्टचाही चिनी कंपनी हुवाईला दणका, स्टोअरवरून हटविले लॅपटॉप
ट्रम्प प्रशासनाने चीनी कंपन्याबाबत धोरण बदलल्यानंतर इंटेल आणि क्वालकोम्न या कंपन्याही हुवाईबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हुवाईचे मेटबुक एक्सप्रो हे मायक्रोसॉफ्टच्या स्टोअरवर उपलब्ध नाही. मायक्रोसॉफ्टने हुवाईच्या लॅपटॉपची ऑनलाईन विक्री थांबविल्याचे अमेरिकेतील माध्यमाने म्हटले आहे. या बंदीमुळे हुवाईच्या सर्व्हर व्यवसायावर परिणाम होवू शकतो. मायक्रोसॉफ्ट आणि हुवाई या दोन्ही कंपन्या हायब्रीड क्लाउड सोल्यूशन सेवा देतात. त्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या सर्टिफाईड हुवाई सर्व्हरचा वापर करण्यात येतो.
हुवाईच्या अँडाईड हँडसेटला ९० दिवसापर्यंत गुगलने अपडेट देणार आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनी कंपन्याबाबत धोरण बदलल्यानंतर इंटेल आणि क्वालकोम्न या कंपन्याही हुवाईबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.