नवी दिल्ली - चिनी दूरसंचार कंपनी हुवाईने व्होडाफोन आयडिया नेटवर्कमध्ये कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान ५ जीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
सातत्याने भविष्यवेधी, नेटवर्कची क्षमता वाढविणाऱ्या नव्या पिढीतील तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे व्होडाफोन आयडियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी विशांत व्होरा यांनी सांगितले. डिजिटल युगासाठी कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापरकर्त्यांसाठी चांगला अनुभव ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हुवाई इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चेन यांनी व्होडाफोन आयडियाबरोबर भागीदारी करताना आनंद होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते ५ जीच्या भविष्यासाठी तयार होत असल्याचेही चेन यांनी म्हटले.
हेही वाचा-गुणवत्तेच्या आधारे आम्हाला पारखा ; हुवाईचा भारताला सल्ला