हैदराबाद -शेअर बाजारात अस्थिरता ( fluctuations in stock market indices ) असताना तुम्हाला जास्त दराने म्युच्युअल फंडच्या युनिटची विक्री करायची आहे ? कमी दर झाल्यानंतर पुन्हा गुंतवणूक करायची आहे? प्रत्यक्षात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी कोणतीच अशी निश्चित वेळ नसते. काही विशिष्ट प्रकरणातच गुंतवणुकीची रक्कम काढता येते. विशेषत: काही मुदतीत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ही बंधने असतात.
म्युच्युअल फंड गुंतवणूक प्लॅन - एसआयपी (SIP)म्हणजे सिस्टिमॅक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (Systematic Investment Plan) तुम्हाला छोटीशी रक्कम काही नियमित टप्प्यात गुंतवणूक ( different ways of investing in mutual funds ) करता येते. तुमचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी म्युचच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ( invest in mutual funds to achieve a financial goal ) करा. बाजारातील कशीही स्थिती असली तरी तुमचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित करेपर्यंत ही गुंतवणूक करा. मात्र, ते करताना जोखीम कमी करण्यासाठी काळजी घ्या. काही ठराविक काळाने रक्कम ही बँक खात्यामध्ये जमा करा. ही प्रक्रिया दोन ते तीन वर्षांनी सुरू करायला हवी. त्यानंतर बाजारातील घसरणीचे संकट आल्यानंतरही त्याचा परिणाम फारसा जाणवणार नाही.
हेही वाचा-बचत करणे अथवा कर्ज घेणे - गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला