हैदराबाद- जीवन विमा पॉलिसी ( Life Insurance Policy ) ही अपघात, आरोग्याबाबत ( health ) असणाऱ्या समस्यांबाबात संरक्षण देत असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही वेळेवर हप्ते भरत असता तोपर्यंत तुम्हाला या पॉलिसी (policy) संरक्षण देत राहतात. ज्यावेळी विमाधारकाचे निधन होते, तेव्हा विम्याच्या ( Insurance ) अटींनुसार त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांना लाभ दिला जातो. म्हणूनच, निधानानंतर तुम्ही आपल्या कुटंुबाचे आर्थिक संरक्षण करत आहात ही खात्री करुण देण्यासाठी विमा ( Insurance ) कवच खरेदी करणे अत्यंत महत्वाचे आहे.
मात्र, केवळ विमा ( Insurance ) काढणे पुरेसे नसून, पॉलिसीचा ( policy ) दावा करतेवेळी कोणतीही गुंतागुंत होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. पॉलिसी ( policy ) हा विमा ( Insurance ) कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यातील करार असल्याने, संबंधिताने सर्व बाबतीत पारदर्शक रहावे. खोटी माहिती दिल्यास पॉलिसाचा क्लेम नाकारण्याची शक्यता अधिक असते. मृत्यू, गंभीर आजार आणि अपघात झाल्यास विम्यावर दावा करणे शक्य आहे मात्र, धारकाने कोणत्या पॉलिसीचे धोरण घेतो? भरपाई कधी मिळणार? हे प्रथम घटक समजून घेणे आवश्यक आहे. तसेच, विमा ( Insurance ) रकमेच्या दाव्यासाठी योग्य माहिती घेत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. सर्व प्रिमीयम वेळेवर दिल्यानंतर पॉलिसी क्लेम भरला जाईल.
विमा पॉलिसी घेताना पारदर्शकपणा ठेवा
अडचणीच्या काळात जेव्हा पैशांची नितांत गरज असते त्यावेळी मदत मिळावी हा विमा ( Insurance ) पॉलिसी घेण्यामागचा प्रमुख उद्देश असतो. त्यामुळे पॉलिसी काढताना विमा ( Insurance ) कंपनीला दिलेली माहिती अचूक आणि स्पष्ट असल्याची खात्री करा. तरच, पॉलिसीची मुदत संपल्यावर अथवा पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर भरपाई मिळेल. विमा ( Insurance ) कंपनी धारकाचे वय, उत्पन्न आणि अन्य बाबींचा विचार करुन पॉलिसी ( policy ) देते. जेव्हा पॉलिसीधारक खोटी माहिती देतो, आणि विम्याचा दावा करताना त्याबाबतचे तपशील चुकीचे आढळून आल्यास कंपनी भरपाई देण्यास नकार देऊ शकते. विमा ( Insurance ) धारकांनी विमा पॉलिसी घेताना आपले जुने आजार लपवु नये कारण कंपन्या त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवतात. त्याची माहिती लपवून पॉलिसी ( policy ) घेतल्यास कळल्यानंतर ती रद्द करण्याचा अधिकार कंपनीला आहे. ज्यांना धुम्रपानाचे व्यसन आहे त्यांनी अवश्य माहिती द्यावी, कारण यामुळे थोडी जास्तीची भरपाई मिळु शकते. कोरोना झाल्यास 90 दिवसांपर्यंत कोणतेही विमा ( Insurance ) संरक्षण मिळत नाही. तर, काही कंपन्या दोन डोस ( Corona Vaccine ) घेणाऱयांना विम्याच्या प्रिमीयमवर काही प्रमाणात सूट देतात.
या गोष्टींची घ्या काळजी
समजा, एखाद्याचे वार्षिक वेतन 20 लाख रुपये आहे आणि कंपनी वार्षिक पगाराच्या 10 पट विमा काढते. याचा अर्थ पॉलिसीधारक 2 कोटींच्या विमा ( Insurance ) संरक्षणासाठी पात्र असतो. जर समजा पॉलिसी ( policy ) काढल्यावर कंपनीच्या तपासात उत्पन्न फक्त 10 लाख रुपये आढळल्यास, कंपनी पॉलिसीची भरपाई करण्यास नकार देते. तसेच, तुम्ही यापुर्वी कोणतीही पॉलिसी ( policy ) घेतली असेल, तर त्याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. वेळोवेळी केवायसी ( KYC ) तपशील अपडेट करा. फोन क्रमांक, ई-मेल आणि घरचा पत्ता बदलल्यास माहिती कंपनीला कळवा. अन्यथा विम्या कंपनी दावा नाकारु शकतात. पॉलिसी ( policy ) ऑनलाईन ( Online )घेतली असल्यास त्याची हार्डकॉपी आणि प्रीमीयमच्या पावत्या त्यासोबतच जोडा. तुमच्या विम्यावर कोणीही दावा करतील यासाठी वारसाचे नाव आधीच समाविष्ट करणे आवश्यक आहे. अद्यापही अनेकजण याबाबत निष्काळजीपणा करतात. तुमच्या पॉलिसीत ( policy ) वारसाचे नाव, आधार कार्ड (Adhar Card), पॅन कार्ड ( Pan Card)वरील नाव, जन्मतारखेचा तपशील जुळला पाहिजे. बँक खात्याची माहितीत बदल केल्यास कळवा. भरपाई दुसऱ्याच्या हातात जाऊ नये यासाठी विमा (Insurance) कंपन्या पॉलिसी ( policy ) दाव्याच्या वेळी वारसाला काही प्रश्न उपस्थित करतात. त्याचसोबत, दावा करतेवेळी संबंधितांची कागदपत्रे, मृत्यूचे प्रमाणपत्र. केवायसी आणि बँक तपशील कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे.