महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Improve credit score : तुमचा क्रेडिट स्कोर कसा वाढवाल? - क्रेडिट स्कोअर रेटिंग

एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 700 च्या खाली असल्यास, बँका आणि संस्थांना त्याचा/तिचा कर्ज नाकारण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कमी क्रेडिट स्कोअरसह कर्ज मिळवणे हे एक आव्हान बनते. कर्ज न भरल्याने एखाद्या व्यक्तीचे क्रेडिट स्कोअर रेटिंग कमी होऊ शकते.

credit score
credit score

By

Published : Feb 8, 2022, 7:41 PM IST

हैदराबाद - क्रेडिट स्कोअर ( credit score ) हा एखाद्या व्यक्तीचा परतफेडीसाठी महत्वाचा मानला जातो. क्रेडिट स्कोअर 750 च्या वर असल्यास एकतर नवीन कर्ज घेणे किंवा व्याजदरात सूट मिळवणे या गोष्टी शक्य होतात. अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींमुळे क्रेडिट स्कोअर खराब करतात. अशा चुका कशा टाळायच्या याबाबत जाणून घ्या. बँका आणि वित्तीय संस्था क्रेडिट स्कोअरला अधिक महत्त्व देतात. 750 स्कोअर असलेल्या व्यक्तीला कर्ज घेण्यास सोपे जाते. योग्य नियोजनाने ते साध्य करता येते. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे हे व्यावहारिकदृष्ट्या कठीण जाते. कोरोनामुळे ईएमआय, क्रेडिट कार्ड बिले पाठवण्यात विलंब होऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 700 च्या खाली असल्यास, बँका आणि संस्थांना त्याचा/तिचा कर्ज नाकारण्याची शक्यता जास्त असते. कर्ज मंजूर केला तरीही बँका अधिक व्याजदर आकारू शकतात. या सर्व समस्या लक्षात घेता, कमी क्रेडिट स्कोअरसह कर्ज मिळवणे हे एक आव्हान बनते.

व्यक्तीचा क्रेडिट स्कोर होतो कमी

कर्ज न भरल्याने एखाद्या व्यक्तीचे क्रेडिट स्कोअर रेटिंग कमी होऊ शकते. जर प्राप्तकर्ता तीन महिने सतत EMI पाठवत नसेल, तर बँका कर्जाला NPA (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) म्हणून चिन्हांकित करू शकतात. जर पैसे पाठवणे पूर्णपणे बंद झाले, तर बँका त्यास डीफॉल्ट म्हणून संबोधतात, आणि एकूण कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी योजना तयार करतील. याला 'सेटलमेंट' म्हणतात.रकमेची परतफेड केल्यास, बँका कर्ज माफ करतील. बँका ते क्रेडिट बोर्डांना देखील कळवतील. त्यानंतर, एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टवर कर्जासाठी 'सेटलमेंट' पाहिल्यानंतर बँका कर्ज मंजूर करण्यापूर्वी दोनदा विचार करतील. जर एखाद्याने आधीच सेटलमेंट पर्याय निवडला असेल, तर कर्जाची संपूर्ण रक्कम क्लिअर करणे चांगले आहे. नंतर कलम 'सेटलमेंट' वरून 'क्लोज' मध्ये बदलले जाईल आणि क्रेडिट स्कोअरमध्ये वाढ होऊ शकते.

ईएमआयला उशीर झाल्यास काय होईल

जर ईएमआयला उशीर झाला, तर क्रेडिट स्कोअरवर १०० गुणांचा परिणाम होईल. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी वेळेपूर्वी ईएमआय पाठवणे चांगले आहे. आर्थिक संकट असल्यास, एखाद्या व्यक्तीला वेळेत क्रेडिट कार्डची किमान रक्कम द्यावी लागेल. एखाद्या व्यक्तीची नोकरी किंवा आजारपणामुळे अचानक होणारा खर्च याबाबत बँकांना जराही काळजी नसते.

महिन्यातून एकदा क्रेडिट स्कोअर तपासा

ज्या व्यक्तींनी कर्ज घेतले आहे, त्यांनी महिन्यातून एकदा तरी त्यांचा क्रेडिट स्कोअर तपासत राहणे आवश्यक आहे. अनेक वेबसाइट ही सेवा मोफत देतात. चांगली वेबसाइट निवडणे ही मुख्य गोष्ट आहे. काही तफावत आढळल्यास, बँकांना त्याबद्दल माहिती द्या. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी वैयक्तिकरित्या क्रेडिट स्कोअर तपासा. नवीन कर्ज मिळण्याची शक्यता कमी असल्यास, कर्जाच्या विरोधात सोने किंवा मुदत ठेव तारण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, क्रेडिट कार्डचा वापर कमी करणे चांगले आहे, असे BankBazaar.com चे CEO अधील शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा -Stock Market Updates: सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 100 पेक्षा अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी 17,750 पर्यंत खाली आली

ABOUT THE AUTHOR

...view details