हैद्राबाद:घर विकत घेणे ही प्रत्येकाच्या जीवनातील एक स्वप्न असते. प्रत्येकाच्या यादीत घर घेण्याचा मुद्दा अग्रस्थानी असतो. तो पुर्ण करण्यासाठी गृहकर्जाची मदत घेतली जाते. त्यासाठी मग कमी व्याजदरावर गृहकर्ज देणाऱ्या बॅंकेचा शोध घेतला जातो. परंतु आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तरच तुम्हाला लवकर कर्ज मंजूरी मिळू शकते. बॅंका कमी व्याजदराने गृहकर्ज देत असल्यामुळे लोक घर खरेदीला प्राधान्य देत आहेत.या पार्श्वभूमीवर, आपल्या गरजेनुसार कर्ज कसे मिळवायचे याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. एखाद्या व्यक्तीला कर्ज देताना बॅंका किंवा गृहनिर्माण कंपन्या कोणत्या घटकांचा विचार करतात? कर्ज मिळवण्यासाठी त्यांची पात्रता वाढवण्यासाठी कर्जदाराने कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सिबिल स्कोअर महत्वाचा
कर्ज मंजुरी प्रक्रियेत क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड सिबिल स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावते. तुमचा स्कोअर जितका जास्त तीतकी तुमची कर्ज मंजूरीची शक्यता जैसेत असते. जर तुम्हाला त्वरीत कर्ज हवे असेल तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर सुधारावा लागेल. त्यासाठी तुमचे इतर कोणते हप्ते असतील किंवा मग क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे आवश्यक आहे. हे हप्ते भरायला वेळ झाला तर तुमचा स्कोअर कमी येतो तो 750 पेक्षा जास्त असणे चांगले असते.
जर कुटुंबातील दोनपेक्षा जास्त सदस्य कमावत असतील तर संयुक्त कर्जासाठी अर्ज करणे चांगले. याचा चांगला परिणाम होतो. हे कर्ज पती- पत्नी आणि पालकांना मिळून घेता येते. क्रेडिटची पात्रता वाढवण्या व्यतिरिक्त ईएमआय चे ओझे कमी होऊ शकते आणि आयकर कपातीसाठी पण ते फायद्याचे राहते.
कालावधी वाढवता येतो
जेव्हा मोठ्या प्रमाणात कर्जाची आवश्यकता असते तेव्हा कालावधी शक्य तितका मोठा असल्याची खात्री करायला हवी. यामुळे ईएमआयचा बोजा कमी होईल आणि तुमचे कर्ज ही वाढेल पण या मुळे व्याजाच बोजा वाढेल हे विसरू नका.
सगळ्या स्त्रोतांचे उत्पन्न उघड करा
गृहकर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी इतर स्त्रातांकडून मिळणारे उत्पन्न दाखवणे पण महत्वाचे आहे. जर तुम्ही आधीच दोन किंवा तीन कर्जे घेतलेली असतील तर ते नवीन कर्ज घेण्यास अडथळा ठरू शकते. म्हणून लहान कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या 40 टक्यापेक्षा जास्त ईएमआय असणे चांगले नाही. त्यामुळे इतर स्त्रोतांकडून येत असलेले उत्पन्न तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असलेल्या बॅंकांना कळवावे. जसेकी, घर भाड्याचे उत्पन्न, व्यवसाय व शेतीचा तपशील दाखवा. त्यामुळे जास्त कर्ज मिळू शकते.
कमी स्कोअर ला जास्त उच्च-व्याज दर