महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

उत्तराखंडची मशरुम गर्ल : उद्योगातील भरारीने दिली ग्रामीण भागातील लोकांना रोजगारांची संधी - दिव्या रावत

दिव्याने त्यांना मशरुमच्या व्यवसायाचा चांगला पर्याय दिल्याने त्यांचे जीवनमान उंचावले आहे. दिव्याने पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांना सक्षमीकरण करण्यासाठी उद्योग सुरू केला. त्यातून अनेकांना व्यवसायाच्या संधी मिळाल्या आहेत. उद्योग वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करा, असे दिव्या सांगते.

दिव्या रावत

By

Published : Mar 8, 2019, 1:12 PM IST

Updated : Mar 10, 2019, 3:25 PM IST

देहरादून - घर चालविण्यापासून यशस्वी उद्योग चालविण्यापर्यंत आजच्या महिलांनी प्रगती केली आहे. काही महिलांनी तर नाविन्यपूर्ण कल्पना आणि आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवित इतरांचेही जीवनमान उंचावले आहे. अशीच एक उत्तराखंडमधील तरुणी दिव्या रावत, उत्तराखंडमध्ये तिला मशरुम गर्ल म्हणून ओळखले जाते.

मशरुम गर्ल पॅकेज

दिव्याने सुरुवातीलाच शहरी झगमगाटापासून ग्रामीण जीवनात करणे पसंत केले. तिने उत्तराखंडमधील हवामानाला पोषक असणाऱ्या मशरुमची कमी खर्चात लागवड करून दाखविली आहे.कमी उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेक तरुणांना गावातून उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित व्हावे लागत होते. तिने उत्तराखंडमधील भौगोलिक स्थितीचा अभ्यास केल्यानंतर तिच्या लक्षात आले की, मशरुमच्या मागणीप्रमाणे बाजारपेठेत पुरवठा होत नाही. तेव्हा तिने चांगला नफा मिळवून मशरुमचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिव्याने त्यांना मशरुमच्या व्यवसायाचा चांगला पर्याय दिल्याने त्यांचे जीवनमान उंचावले आहे. दिव्याने पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांना सक्षमीकरण करण्यासाठी उद्योग सुरू केला. त्यातून अनेकांना व्यवसायाच्या संधी मिळाल्या आहेत. उद्योग वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करा, असे दिव्या सांगते.

५० हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर मशरुमचा व्यवसाय -

राष्ट्रीय मशरुम संशोधन केंद्रात मशरुमचे उत्पादन घेण्याचे प्रशिक्षण घेतले. तिने संशोधन आणि प्रयोग करून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे तेव्हा तिच्याकडे कोणतेही भांडवल नव्हते. सध्या तिची बहुमजली मशरुम प्रयोगशाळा आहे. ४ मुली आणि मुलांसमवेत तिने खेडेगावातील एका घरात मशरुमचे उत्पादन घेण्याला सुरुवात केली. मशरुम हा घरगुती प्रकल्प करायचे तिने निश्चित केले होते. कमी गुंतवणूक, साधी पद्धत यातून तिला हा उद्योग जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवायचा होता. आज दिव्या केवळ ५० हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर नवउद्योजकांना मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी मदत करत आहे.

उत्तराखंडमधील हवामानामुळे कमीयेतोखर्च -

उत्तराखंडमधील पोषक हवामानाचा फायदा घेत तिने वेगवेगळ्या प्रकारच्या ३ मशरुमचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. उत्तराखंडमधील वातावरणामुळे वातानुकुलित यंत्र, वातावरण दमट करणाऱ्या यंत्रासह तापमान नियंत्रण ठेवणारे यंत्राची कमी गरज भासते. त्यामुळे मशरुम तयार करण्यासाठी कमी खर्च लागतो. बटन, ऑयस्टर आणि मिल्की मशरुम या मशरुमच्या प्रकरांना सर्वात अधिक उत्तराखंडमध्ये पसंती दिली जाते. या मशरुमचे घरातही उत्पादन घेणे शक्य आहे. कमी जागेत मशरुमचे उत्पादन घेण्यासाठी दिव्याने बांबुचे खास रॅक तयार केले आहेत.

नारीशक्तीच्या पुरस्कारासह अनेक पुरस्काराने दिव्याचा सन्मान -

दिव्याच्या कामाबद्दल तिला राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच तिला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २०१७ ला प्रतिष्ठित असा नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे. तर उत्तराखंड सरकारने तिला उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अनेकांना प्रेरणा देणारी दिव्या मशरुमची करते निर्यात -

दिव्याने मशरुम उद्योगाचा इवलासा लावलेला वेलू आज सौम्या फुड प्रा. लि. कंपनी या माध्यमातून बहरला आहे. या कंपनीच्या माध्यमातून ती देशासह विदेशात मशरुमची निर्यात करते. दिव्या शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागातील लोकांसाठी कृषी क्षेत्राशीन निगडीत कार्यशाळा घेते. मशरुमची लागवडीचे तिचे कौशल्य शिकण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पंजाबमधून अनेक लोक येतात. तिचे व्यवसायाचे मॉडेल शिकण्यासाठी ग्रामीण भागातील अनेकजण उत्सुक असतात. मशरुमच्या व्यवसायामुळे गावाचा कायापालट झाला आहे. हा व्यवसाय राज्यभरातही पसरला आहे. नारीशक्ती काय असू शकते, याची प्रचिती खऱ्या अर्थाने 'मशरुम गर्ल' दिव्याने दाखवून दिली आहे.

Last Updated : Mar 10, 2019, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details