नवी दिल्ली - हॉटेल रुमच्या भाड्यावर लागणाऱ्या जीएसटीत शुक्रवारी कपात करण्यात आली आहे. या निर्णयाने आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास हॉटेल उद्योगांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हे पाऊल योग्य दिशेने असल्याचेही उद्योगाने म्हटले आहे.
जीएसटी समितीने सकारात्मक पाऊल उचलल्याचे इंडियन हॉटेल्स कंपनी लि. कंपनीचे (आयएचसीएल)एमडी आणि सीईओ पुनित छटवाल यांनी म्हटले आहे. आदरातिथ्य उद्योगाला आवश्यक असलेली चालना मिळणार आहे. तसेच पर्यटकांच्या बुकिंगची संख्या वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले. रोजगार निर्मितीला संधी मिळणार असल्याचा विश्वास पुनित छटवाल यांनी व्यक्त केला. सरकारच्या प्रगतीशील उपक्रमाचे शांगरी-ला ग्रुपच्या इंडियन ओसियनचे उपकार्यकारी अध्यक्ष जॉन नॉर्थन यांनी स्वागत केले. आलिशान हॉटेल रुमवरील कर कमी केल्याने पर्यटकांची मागणी वाढेल, असेही ते म्हणाले.
जीएसटी कपातीचे हॉटेल उद्योगांकडून स्वागत - Nirmala Sitharaman
जीएसटी परिषदेने सकारात्मक पाऊल उचलल्याचे इंडियन हॉटेल्स कंपनीचे (आयएचसीएल) एमडी आणि सीईओ पुनित छटवाल यांनी म्हटले आहे.

संग्रहित
जीएसटी परिषदेत हे घेण्यात आले निर्णय-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७५०० रुपयाचे भाडे असलेल्या हॉटेल रुमवरील कर २८ टक्क्यावरून १८ टक्के केला. तर १ हजार ते ७५०० भाडे असलेल्या रुमवर १२ टक्क्यावर कर आणला आहे. रुम भाडे १ हजार रुपयापर्यंत असल्यास जीएसटी लागणार नाही.
हेही वाचा-..तर तुमचा मोबाईल क्रमांक ११ अंकी होईल