नवी दिल्ली- केंद्र सरकारने देशामध्ये दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली आहे. असे असले तरी केशकर्तनालयाची दुकाने (सलून) व दुकाने बंद राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने केवळ वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांबाबत आदेश दिले आहेत. केशकर्तनालय हे सेवा क्षेत्रात आहेत. त्यामुळे दुकानांबाबतचे आदेश केशकर्तनालयाला लागू होत नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले. कोरोनाच्या लढ्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शकतत्वानुसार दारूच्या विक्रीवर निर्बंध आहेत. त्यामुळे दारूचे दुकानेही बंद राहणार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.