हैदराबाद : गृह कर्ज हे आता बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त कर्जांपैकी एक आहे. आपल्याला कोणत्याही बँक आणि वित्तीय संस्थेकडून होम लोन लगेच मिळते. लोन घेण्या अगोदर हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, जर हप्ते वेळेवर भरले नाहीत तर कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते.
सलग तीन महिन्यापर्यंत हप्ते वेळेवर भरले नाही, तर बँक आणि वित्तीय संस्था ते खाते तात्पुरते डिफॉल्ट मानतात. ते कर्जदाराला नोटीस पाठवतात. नोटीसनंतरही ही उत्तर नाही दिले, तर कर्ज वसूलीसाठी आवश्यक पाऊल उचलतात. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर, बँक किंवा वित्तीय संस्था हे जाणूनबुजून डिफॉल्ट मानते. त्यानंतर ती गृहकर्ज थकबाकीदारांना (Home loan installments) घराच्या लिलावाच्या नोटिसा जारी करतात.
हप्ते भरण्यास विलंब झाल्यास बँका हप्त्याच्या रकमेच्या एक ते दोन टक्के दंड आकारतात. जेव्हा एखादे कर्ज डिफॉल्ट होते, तेव्हा ते कर्ज एनपीए म्हणून वर्गीकृत केले जाते. या अगोदर बँक कर्ज घेणाऱ्याला बऱ्याचवेळा नोटीसा पाठवते (Notice to bank borrower). काही कंपन्या कर्ज वसुलीसाठी थर्ड पार्टी सेवा (Third party services for debt recovery) घेतात. कर्ज एनपीए झाल्यावर कर्जदार आणि बँक यांच्यात वादाला वाव राहतो. यानंतर, बँक तिच्याकडून घेतलेले इतर कर्ज देखील NPA खात्याशी जोडते. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
जर हप्ते योग्य पद्धतीने भरले नाहीत तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. तुम्ही वारंवार EMI भरत नसल्यास, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. बँकांनी आता त्यांचे व्याजदर रेपोशी जोडले आहेत. या कारणास्तव कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याज निश्चित केले जाते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. जर बँक हे सिद्ध करू शकते की हप्ते न भरण्याचे डिफॉल्ट हे जाणूनबुजून केले गेले आहे, तर त्याचा कर्जदाराच्या पतपात्रतेवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जास्त व्याज किंवा इतर कारणांमुळे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज बदलायचे असेल, तर जुन्या बँकेत EMI न भरल्यामुळे तुमचा अर्ज नवीन वित्तीय संस्थेकडून नाकारला जाऊ शकतो. यानंतर, भविष्यात वैयक्तिक, वाहन किंवा इतर नवीन कर्ज घेण्यास देखील समस्या येऊ शकते.
या समस्येवर उपाय काय?
सर्व प्रथम हप्ते भरण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याची परतफेड करण्यासाठी तुम्ही मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेऊ शकता. तुमच्याकडे फिक्स्ड डिपॉझिट आणि विमा पॉलिसी (Fixed deposit and insurance policy) असल्यास, तुम्ही त्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घ्यावा आणि जेव्हा परिस्थिती योग्य असेल तेव्हा ही सर्व थकबाकी त्वरित भरावी. तुमच्याकडे खूप आर्थिक अनिश्चितता असल्यास, प्रथम कमी व्याजाच्या गुंतवणूक योजनांसाठी जा. कर्जाचा बोजा कधीच संपणार नाही आणि ते फेडण्याचे मार्ग बंद झाले आहेत असे वाटत असेल तर ते घर विकण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही हे समजून घ्या.
जर तुम्ही अनेक वर्षांपासून गृहकर्जाचा ईएमआय (Equated monthly instalment ) भरला नसेल, तर जीवन विमा पॉलिसी कर्ज घेऊन हप्ता भरू शकतात. लक्षात ठेवा की, हे तेव्हाच करा जेव्हा आपल्याकडे रोजगार नाही किंवा तुमची नेहमीची मिळकत बंद झाली आहे. प्रत्येक कुटुंबात एखादा असा इमरजेंसी फंड असावा, ज्याच्यामध्ये कमित कमी सहा महिण्यांचे हप्ते भरण्या इतकी रक्कम शिल्लक असावी. ज्यामुळे तुमच्यावर कोणताही आर्थिक दबाव येणार नाही. नेहमी कमी हप्त्यांचे लोन घ्यावे आणि आपल्या साधनांच्या हिशोबाने घ्यावे. बँकबाजार डॉट कॉम चे सीइओ आदिल शेट्टी यांच्यानुसार,जेव्हा आपल्या वाटते आपली स्थिती ज्यादा खराब होत आहे. त्यावेळी तुम्ही बँकेशी संपर्क साधून उपायाचा विचार करावा. कर्ज पुनर्रचना आणि स्थगिती द्वारे तुम्ही स्वतःला वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकता.