नवी दिल्ली- सर्व प्रकारच्या किरकोळ मालाच्या विक्रेत्यांना घरपोहोच उत्पादने विक्री करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रिटेल्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आरएआय) केली आहे. सध्या, केवळ ई-कॉमर्स कंपन्यांनाच घरपोहोच उत्पादने पोहोचविण्याची परवानगी आहे.
केंद्र सरकारने टाळेबंदीदरम्यान ई-कॉमर्स कंपन्यांना ३ मेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. या कंपन्यांना जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकींसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आरएआयनेही अशी परवानगी मागितली आहे. सर्व नियमांचे पालन करून उत्पादने घरपोहोच देवू, असे रिटेल असोसिएशनने म्हटले आहे.