महाराष्ट्र

maharashtra

कोरोना परिणाम: घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत तिप्पटीने वाढ

By

Published : Aug 25, 2020, 3:25 PM IST

 नोकरी डॉट कॉमचे मुख्य वित्तीय अधिकारी पवन गोयल म्हणाले, की विक्री, ग्राहक सेवा एजंट अशा कामांसाठीही घरातून काम करण्याचा पर्याय देण्यात येत आहे. तर दूरस्थ पद्धतीने नोकऱ्यांच्या पोस्टमध्ये बीपीओ आणि आयटीईएस क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या वाढली आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली – देशात दूरस्थ आणि घरातून काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) प्रमाणात वाढ झाल्याचे एका अहवालातून दिसून आले आहे. कोरोनापूर्वीच्या काळाच्या तुलनेत घरातून काम करण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यात तिप्पटीने वाढले आहे.

दूरस्थ पद्धतीने (रिमोट वर्क) र्मचाऱ्यांना काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लवचिकता मिळते. तसेच त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर चांगले नियंत्रण ठेवता येते. तसेच प्रवासासाठी लागणार वेळ वाचतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यात घरातून काम करण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत तिप्पटीने वाढ झाली आहे.

गेल्या पाच महिन्यात नोकरी डॉट कॉमवर सर्वाधिक 'वर्क फ्रॉम होम' या कीवर्डचे सर्च झाले आहे.नोकरी डॉट कॉमचे मुख्य वित्तीय अधिकारी पवन गोयल म्हणाले, की विक्री, ग्राहक सेवा एजंट अशा कामांसाठीही घरातून काम करण्याचा पर्याय देण्यात येत आहे. तर दूरस्थ पद्धतीने नोकऱ्यांच्या पोस्टमध्ये बीपीओ आणि आयटीईएस क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच आयटी सॉफ्टवेअर, शिक्षण, ई-कॉमर्स क्षेत्रातही घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील दूरस्थ नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details