शिमला - 'कचरा म्हटले की त्याची किंमत शून्य' हे गणित हिमाचल प्रदेशमध्ये बदलणार आहे. कारण एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हिमाचल प्रदेशने अभिनव योजना आणली आहे. असा प्लास्टिकचा कचरा हिमाचल प्रदेश प्रति किलो ७५ रुपये दराने खरेदी करणार आहे.
एकवेळ वापरण्यात येणारे प्लास्टिक हे कचरा गोळा करणारे, घरामधून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हिमाचल प्रदेश खरेदी करणार आहे. त्यासाठीच्या आराखड्याला हिमाचलच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
हेही वाचा-एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिक वापराबाबत गोंधळ!
यापूर्वीही प्लास्टिकवर बंदी घालण्याचे सरकारने घेतले आहेत निर्णय-
गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशने थर्माकोल प्लेटवरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी १ लिटरहून कमी क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलवर बंदी घातली आहे. तर २ ऑक्टोबर २००९ पासून सरकारने पॉलिथिन बॅगवर पूर्णपणे बंदी घातली आहे.