नवी दिल्ली - महागड्या कार आणि ज्वेलरीवर लावण्यात येणारा 'टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स' (टीसीएस) जीएसटीतून वगळण्यात आला आहे. हा निर्णय केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि शुल्क मंडळाने घेतला आहे.
प्राप्तीकर कायद्यानुसार १० लाखांहून अधिक किंमत असलेल्या वाहनांवर १ टक्के टीसीएस शुल्क लावण्यात येत होता. तर हाच कर 5 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ज्वेलरी आणि २ लाख रुपयाहून किमतीच्या बुलियनवर (सोन्याची बिस्कीटे आदी) लावण्यात येत होता. हा कर इतर वस्तुंवरही वेगवेगळ्या दराने लावण्यात येत होता.