नवी दिल्ली - पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने या इंधनाच्या घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये देशातील इंधनाच्या वापरात घसरण झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
पेट्रोल व डिझेल या दोन्ही इंधनाच्या वापरात घसरण झाली आहे. ही माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पीपीएसीच्या सेलने दिली आहे. पेट्रोलियम उत्पादनांचा वापर फेब्रुवारीमध्ये ४.९ टक्क्यांनी घसरून १७.२१ दशलक्ष टन राहिला आहे.
हेही वाचा-उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत जगात सर्वाधिक वाढ; एलॉन मस्कलाही टाकले मागे
- इंधनात डिझेलचा सर्वाधिक प्रमाण होत असतो. मात्र, डिझेलच्या वापराचे प्रमाण ८.५ टक्क्यांनी घसरून ६.५५ दशलक्ष टन झाले आहे.
- पेट्रोलच्या वापराचे प्रमाण ६.५ टक्क्यांनी घसरून २.४ दशलक्ष टन झाले आहे.
- देशात गतवर्षी मार्चमध्ये टाळेबंदी लागू केल्यानंतर इंधनाच्या मागणीत कमालीची घसरण झाली होती. मे महिन्यात टाळेबंदी खुली झाल्यानंतर इंधनाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली होती. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबरमध्ये देशातील पेट्रोलचा वापर वाढून २.७ दशलक्ष डॉलर झाले आहे. तर एप्रिलमध्ये पेट्रोलच्या वापराचे प्रमाण अवघे ०.९७ दशलक्ष डॉलर होते.
- इंधनाच्या किमतीमध्ये जानेवारी २०२१ पासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम इंधनाच्या वापरात घसरण झाली आहे. जानेवारीत पेट्रोलचा वापर २.६ दशलक्ष टन झाला आहे. तर फेब्रुवारीमध्ये पेट्रोलचा वापर २.४३ दशलक्ष टन झाला आहे.