महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बीएस-४ वाहनांच्या विक्रीला मुदतवाढ द्या; हिरो मोटोकॉर्पची सर्वोच्च न्यायालयात याचिका - बीएस ४ वाहने

कोरोनोने सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता बीएस-४ वाहनांच्या विक्रीकरता तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी हिरो मोटोकॉर्पने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

हिरो मोटोकॉर्प
हिरो मोटोकॉर्प

By

Published : Mar 20, 2020, 2:41 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाने वाहनांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीएस-४ मानक असलेल्या वाहनांची विक्री करण्याला मुदतवाढ द्यावी, असे कंपनीने याचिकेत म्हटले आहे.

कोरोनोने सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता बीएस-४ वाहनांच्या विक्रीकरता तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी हिरो मोटोकॉर्पने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

हेही वाचा-उद्योगांना आर्थिक पॅकेज मिळण्याची शक्यता; पंतप्रधानांकडून टास्क फोर्सची घोषणा

कोरोना पसरत असल्याने लोक केवळ महत्त्वाची कामे करण्यासाठीच घराबाहेर पडत आहेत. वाहन कंपनी आणि डीलरला जुनी बीएस-४ मानकांची वाहने विकण्यात अडथळे येत आहेत. नुकतेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननेही (एफएडीए) बीएस-४ वाहनांच्या विक्रीला मुदतवाढ देण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

हेही वाचा-सीएआयटीचा 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा, देशभरात रविवारी बंद राहणार दुकाने

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कार्बनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या बीएस - ६ वाहनांचीच केवळ १ एप्रिलपासून विक्री करण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत. त्यामुळे बीएस-४ वाहनांची विक्री १ एप्रिल २०२० नंतर करण्यात येणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details