महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

हिरोकडून देशातील पहिली बीएस-६ मोटारसायकल लाँच; एवढी आहे किंमत - BS-VI vehicles

नवी मोटारसायकल ही देशाच्या बाजारपेठेत टप्प्याटप्प्यात उपलब्ध होईल, असे हिरो मोटोकॉर्प विक्रीचे प्रमुख संजय भान यांनी सांगितले. ग्राहकांची इच्छा आणि देशाची भौगोलिक बाजारपेठ लक्षात घेवून मोटारसायकलची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या मॉडेलहून नव्या मॉडेलची किंमत ही ७ हजार ४७० रुपयांनी अधिक आहे.

न्यू स्प्लेंडर आयस्मार्ट

By

Published : Nov 7, 2019, 6:27 PM IST

नवी दिल्ली - देशातील पहिली बीएस-६ इंजिन क्षमता असलेली मोटारसायकल हिरो मोटोकॉर्पने लाँच केली आहे. या लाँच केलेल्या 'न्यू स्प्लेंडर आयस्मार्ट' ची ६४ हजार ९०० रुपये किंमत आहे.

मोटारसायकलला ११०सीसी फ्यूएल इंजेक्शन इंजिन आहे. त्याची '९ बीएचपी'ची पॉवर आहे. यामध्ये उच्च क्षमतेची इंधन क्षमता असल्याचे हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे. या मोटारसायकलची संपूर्णपणे रचना, चेसीचे संरचना आणि निर्मिती ही जयपूरमधील 'सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी'मध्ये करण्यात आली आहे. ही माहिती हिरो मोटोकॉर्पचे प्रमुख (ग्लोबल प्रॉडक्ट प्लॅनिंग) मॅलो ली मॅस्सन यांनी दिली.

हेही वाचा-वित्तीय आकडेवारीबाबत भारताने पारदर्शी रहायला पाहिजे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी मोटारसायकल ही देशाच्या बाजारपेठेत टप्प्याटप्प्यात उपलब्ध होईल, असे हिरो मोटोकॉर्प विक्रीचे प्रमुख संजय भान यांनी सांगितले. ग्राहकांची इच्छा आणि देशाची भौगोलिक बाजारपेठ लक्षात घेवून मोटारसायकलची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या मॉडेलहून नव्या मॉडेलची किंमत ही ७ हजार ४७० रुपयांनी अधिक आहे.

हेही वाचा-'या' कारणाने दिल्ली-मुंबई मार्गावरील विमान तिकिट दरात वाढ

काय आहे बीएस मानक
बीएस-६ अथवा भारत स्टेज ६ हे वाहनाच्या इंजिनामधून होणाऱ्या उत्सर्जनाचे (एमिशन) मानक आहे. या मानकाची इंजिनक्षमता नसलेल्या वाहनांच्या विक्रीवर १ एप्रिल २०२० नंतर बंदी असणार आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी बीएस-६ वाहनांचा वापर अनिवार्य करण्यासाठी १ एप्रिल २०२० ही शेवटची मुदत दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details