नवी दिल्ली - खासगी बँक एचडीएफसीचा नफा तिसऱ्या तिमाहीत ३२.८ टक्क्यांनी वाढला आहे. बँकेने डिसेंबरअखेर ७,४१६.५ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे.
एचडीएफसी बँकेने मागील आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीदरम्यान ५,५८५.९ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत एचडीएफसी बँकेचे उत्पन्न वाढून ३६ हजार ३९ कोटी रुपये झाले आहे. तर मागील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एचडीएफसी बँकेने ३०,८११.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते.
हेही वाचा-चालू वर्षात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता, कारण...