महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना नेटबँकिंगसह मोबाईल अॅप वापरताना अडचणी - HDFC Bank mobile app issue

ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या सेवेतील त्रुटीबाबत समाज माध्यमात तक्रार केल्या आहेत. त्रुटी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एचडीएफसी बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.

HDFC Bank
एचडीएफसी बँक

By

Published : Mar 30, 2021, 8:50 PM IST

मुंबई - एचडीएफसी बँकेच्या डिजीटल सेवेमध्ये पुन्हा एकदा त्रुटी समोर आली आहे. बँकेच्या काही ग्राहकांना नेटबँकिंग आणि मोबाईल अॅपची सेवा घेताना अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे.

ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या सेवेतील त्रुटीबाबत समाज माध्यमात तक्रार केल्या आहेत. त्रुटी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एचडीएफसी बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे. काही ग्राहकांना नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरताना समस्या जाणवत आहे. त्याकडे आम्ही प्राधान्याने पाहत आहोत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करून पाहा. धन्यवाद, असे एचडीएफसी बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ६ लाख कोटींची भर; शेअर बाजार तेजीचा परिणाम

चार महिन्यांपूर्वी बँकेच्या इंटरनेट आणि देयक व्यवस्थेत मोठी समस्या निर्माण झाली होती. प्रायमरी डाटा सेंटरमधील वीज पुरवठा खंडित झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे बँकेने स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबरमध्ये एचडीएफसी बँकेले सर्व नवीन डिजीटल सेवा लाँच तात्पुरत्या काळासाठी लाँच करण्यावर निर्बंध लादले होते. एचडीएफसी बँकेच्या आयटी पायाभूत सुविधांचे विशेष ऑडिट करण्यासाठी आरबीआयने बाह्य आयटी कंपनीची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा-चार राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावरच केंद्राकडून इलेक्टोरल बाँडला परवानगी

एचएफडीसीवर नवे कार्ड काढण्यावर आरबीआयने लादले आहेत निर्बंध

लेखीपरीक्षण झाल्यानंतर आरबीआयकडून एचडीएफसीवरील डिजीटल नवीन कार्ड काढण्यावरील निर्बंध हटविण्यात येण्याची शक्यता आहे. आरबीआयने डिसेंबरमध्ये एचडीएफसीला नवीन डिजीटल उपक्रम अथवा क्रेडिट काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत. कारण, दोन वर्षांपासून बँकेच्या डिजीटल सेवांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. सप्टेंबर 2020 च्या आकडेवारीनुसार एचडीएफसीचे देशात क्रेडिट कार्डचे सर्वाधिक 1.49 कोटी ग्राहक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details