महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रयत्न' - international flights before August

जर स्थिती लवकर सुधारली तर ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू होईल, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

संग्रहित
संग्रहित

By

Published : May 23, 2020, 4:56 PM IST

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सेवा ऑगस्टपूर्वी चांगल्या प्रमाणात सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. ही माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी फेसबुक लाईव्हमधून दिली.

देशातंर्गत विमान वाहतूक सेवा २५ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून देशात टाळेबंदी लागू करण्याची घोषणा केली. तेव्हापासून सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा खंडित करण्यात आली आहे. त्यामागे कोरोनाचा संसर्ग देशात जास्त पसरू नये, हा हेतू होता.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात आरबीआयची खास 'वॉर रूम'; सुरू आहे 24X7 काम

जरी पूर्ण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू झाली नाही तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक चांगल्या प्रमाणात सुरू होणार आहे. त्याबाबत पूर्ण आशावादी असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री पूरी यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले. तरी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होईल, हे सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर स्थिती लवकर सुधारली तर ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-अमेरिकेचा चीनला पुन्हा दणका; 33 कंपन्यांना टाकले काळ्या यादीत!

ABOUT THE AUTHOR

...view details