बंगळुरू – सीमारेषेवर तणावाची स्थिती असताना हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) कंपनीने उच्च भागात काम करू शकणारे कमी वजनाचे दोन लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच) तयार केली आहेत. ही लढाऊ हेलिकॉप्टर अत्यंच उंच भाग असलेल्या लेह येथे तैनात करण्यात आली आहेत. ही लढाऊ हेलकॉप्टर उंच भागात हल्ला करू शकणारे जगातील सर्वात हलके हेलिकॉप्टर आहेत.
सुरक्षा दलाला लागणारी विशेष गरज लक्षात घेवून एलसीएचची खास निर्मिती केल्याचे कंपनीचे सीएमडी आर. माधवन यांनी सांगितले. एचएएलने आत्मनिर्भर अभियानात मोलाची कामगिरी बजाविल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एलसीएचची उंच भागात नुकतेच चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल हरजीस सिंग अरोरा व विग कमांडर (निवृत्त) सुभाष पी. जॉन यांनी सहभाग घेतला. अत्यंत प्रतिकूल तापमान आणि अत्यंत उंच भागात हे लढाऊ हेलकॉप्टर शत्रूवर सक्षमपणे हल्ला करू शकते.