लंडन– हॅकरने इंग्लंड आणि कॅनडामधील ऑक्सफोर्डसह आठ विद्यापीठांवर सायबर हल्ला करत डाटा चोरला आहे. त्यासाठी हॅकरने विद्यापीठांच्या ब्लॅकबाऊड या शैक्षणिक सॉफ्टवेअरला लक्ष्य केले होते.
इंग्लंडसह कॅनडामधील आठ विद्यापीठांवर हॅकरचा सायबर हल्ला - विद्यापीठ हॅकिंग न्यूज
ब्लॅकबाऊड हे शैक्षणिक प्रशासन, निधी गोळा करणे आणि वित्तीय व्यस्थापनासाठी सॉफ्टवेअर वापरले जाते. हे सॉफ्टवेअर हॅकरने मे महिन्यात लक्ष्य केले होते
ब्लॅकबाऊड हे शैक्षणिक प्रशासन, निधी गोळा करणे आणि वित्तीय व्यस्थापनासाठी सॉफ्टवेअर वापरले जाते. हे सॉफ्टवेअर हॅकरने मे महिन्यात हॅक केले होते. त्यानंतर सॉफ्टवेअर कंपनीने डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी हॅकरला जुलैमध्ये पैसे दिले आहेत. पण, किती पैसे देण्यात आले, ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.
सर्व विद्यापीठांनी कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांना पत्र आणि ई-मेल पाठवून डाटा सुरक्षित राहू शकला नसल्याबद्दल माफी मागितली आहे. डाटामध्ये विद्यापीठांना मिळालेला मदतनिधी, फोन क्रमांक आणि विविध कार्यक्रमाच्या माहितीचा समावेश आहे.