नवी दिल्ली - महाराष्ट्र गुंतवणुकीच्याबाबतीत देशात अव्वल असल्याचा मागील फडणवीस सरकारने केलेला दावा फोल असल्याचे समोर आले आहे. देशामध्ये सर्वाधिक ५१ टक्के औद्योगिक आंत्रेप्रेन्युअर सामंजस्य करार हे गुजराजत सरकारबरोबर झाले आहेत. या २०१९ मधील कराराचे एकूण मूल्य हे ३ लाख ४३ हजार ८३४ कोटी रुपये आहे. तर उद्योगात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकावर स्थान आहे.
उद्योगांनी महाराष्ट्राबरोबर वर्ष २०१९ मध्ये १ लाख १५ हजार २७७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. देशामध्ये विविध राज्यांनी एकूण ६ लाख ७८ हजार ८५२ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामध्ये निम्म्याहून अधिक करार म्हणजे ३ लाख ४३ हजार ८३४ कोटी रुपयांचे सामंजस्य करार हे गुजरातबरोबर झाले आहेत.