महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्र सरकारकडून ८० लाख एमएसएमई उद्योगांना मिळणार मोफत बिलिंग सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअरमुळे लघु उद्योगांना इन्व्हॉईस आणि अकाउंट स्टेटमेंट, इन्व्हेंटर आणि जीएसटी रिटर्न तयार करणे सोपे होणार आहे.

प्रतिकात्मक

By

Published : May 28, 2019, 8:02 PM IST


नवी दिल्ली - जीएसटी नेटवर्ककडून देशातील सुक्ष्म-लघु-मध्यम (एमएसएमई) उद्योगांना मोफत अकाउटिंग आणि बिलिंगचे सॉफ्टवेअर दिले जात आहे. याचा लाभ दीड कोटीपर्यंत उलाढाल असणाऱ्या देशातील सुमारे ८० लाख छोट्या उद्योगांना होणार आहे.

सॉफ्टवेअरमुळे लघु उद्योगांना इन्व्हॉईस आणि अकाउंट स्टेटमेंट, इन्व्हेंटर आणि जीएसटी रिटर्न तयार करणे सोपे होणार आहे. हे सॉफ्टवेअर जीएसटी पोर्टल www.gst.gov.in वर उपलब्ध आहे. खरेदी, विक्री, कॅश लेजर, इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट इत्यादी सुविधा सॉफ्टवेअरमध्ये आहेत. मोफत सॉफ्टवेअर देऊन एमएसएमई क्षेत्राला डिजीटल व्यवस्थेत नेण्याचा प्रयत्न असल्याचे जीएसटीएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी सांगितले. यामुळे लघु उद्योगांची कार्यक्षमता वाढेल व इतर अनावश्यक ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जीएसटी परिषदेने लघु उद्योगांना मोफत सॉफ्टवेअर देण्याच्या निर्णयाला जानेवारीत मान्यता दिली होती. जीएसटीने आठ बिलिंग आणि अकाउंट सॉफ्टवेअर पुरवठादारांबरोबर भागीदारी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details