नवी दिल्ली- केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ३९ वी जीएसटी परिषदेची बैठक पार पडत आहे. या बैठकीला केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर हेदेखील उपस्थित आहेत.
मोबाईल, खते, हातमागाचे कापड आणि गारमेंट यांच्यावरील वस्तू व सेवा (जीएसटी) कर १८ टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी वाढल्याने उत्पादकांकडील खेळते भांडवल वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, त्यामुळे काही वस्तुंच्या किमती वाढणार आहेत.