नवी दिल्ली- कोरोनापूर्वीच्या स्थितीप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था होत असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. गतवर्षीच्या सप्टेंबरहून चालू वर्षात सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन झाले आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज जाहीर केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमधील जीएसटीचे संकलन हे गतवर्षीहून ४ टक्क्यांनी अधिक आहे. टाळेबंदीनंतरच्या सहाव्या महिन्यात सप्टेंबरमध्ये जीएसटीचे ९५ हजार ४८० कोटींचे संकलन झाले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये ९१ हजार ९१६ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
- केंद्रीय जीएसटी - १७,७४१ कोटी रुपये
- राज्य जीएसटी - २३,१३१ कोटी रुपये
- एकत्रित जीएसटी (आयजीएसटी)- ४७,४८४ कोटी रुपये (२२,४४२ कोटींच्या उत्पादन शुल्काचा समावेश)
- उपकर -७,१२४ कोटी रुपये