महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देशातील पेटंटच्या संख्येत १२ टक्क्यांची वाढ - पेटंट

भारतीय बौद्धिक संपदाच्या कार्यालयांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये पेटंटची प्रक्रिया पेपरलेस करण्यासह मनुष्यबळ वाढविणाचे निर्णय घेण्यात आले.

प्रतिकात्मक

By

Published : Mar 9, 2019, 8:33 PM IST

नवी दिल्ली- देशात मंजूर होणाऱ्या पेटंटची संख्या १२ टक्क्याने वाढली आहे. ही वाढ २०१८ च्या एप्रिल-डिसेंबरदरम्यान दिसून आली आहे. ही माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे.

भारतीय बौद्धिक संपदाच्या कार्यालयांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये पेटंटची प्रक्रिया पेपरलेस करण्यासह मनुष्यबळ वाढविणाचे निर्णय घेण्यात आले. पेटंटची तपासणी करण्याची प्रक्रिया वेगवान केल्याने १२ टक्के पेटंटची मंजुरी वाढली आहे. याबाबतचे ट्विट औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) केले आहे.

व्यापारीचिन्हांची नोंद करण्याची संख्याही २७ टक्क्याने वाढली आहे. व्यापारी चिन्ह नोंदविण्यासाठी कार्यालयाकडून प्रयत्न केल्याची माहिती डीपीआयटीने दिली आहे. त्यातून प्रलंबित असलेली पेटंट प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना पेटंट व व्यापारीचिन्ह मंजुरीसाठी प्रशिक्षण दिले आहे.

पेटंट म्हणजे काय असते?

पेटंट म्हणजे बौद्धिक संपदाचे देशाकडून मिळणारे कायदेशीर अधिकार असतात. हे अधिकार २० वर्षांसाठी दिले जातात. या अधिकारामुळे इतर कंपन्यांना त्या पेटंटचा वापर करून उत्पादन करता येत नाही. तसेच त्याची विक्री करता येत नाही. तर व्यापारीचिन्ह (ट्रेडमार्क) हे १० वर्षांसाठी दिले जाते.

मंजूर झालेल्या पेटंट व व्यापारीचिन्हांची संख्या
वर्ष पेटंट मंजूर संख्या व्यापारी चिन्ह मंजुरीची संख्या
२०१८-२०१९ १०,०३६ २,४७,६१५
२०१७-२०१८ ,९४० १,९५,७०५

ABOUT THE AUTHOR

...view details